राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच प्रियंका गांधींचं ट्वीट चर्चेत
प्रियंका गांधींनी ट्वीट करत घोटाळ्यांची यादी मांडली
दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींची बहीण व काँग्रेस सचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियंका गांधी यांनी गुजरात सरकारच्या निर्णयावर ट्वीट करत म्हटलं आहे की, माझा भाऊ कधी कोणाला घाबरत नाही ना यापुढे कधी घाबरेल. आम्ही खरं बोलत जगलोय आणि जगत राहू. या घाबराट सरकारने साम, दाम, दंड, भेद सर्वप्रकारे राहुल गांधींचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्या लोकांनी देशाचे पैसे लुटले भाजपा त्यांचा बचाव करण्यासाठी काम करत आहे, चौकशीपासून पळत आहे. आणि जी लोकं यावर प्रश्न करतात त्यांच्यावर खटले चालवण्यात येत आहेत. नीरव मोदी घोटाळा (१४,००० कोटी), ललीत मोदी घोटाळा (४२५ कोटी), मेहुल चोकसी घोटाळा (१३,५०० कोटी) यांची नावे प्रियंका यांनी नमूद केली आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान मोदींवर टीका करताना सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे, असा सवाल उपस्थिती केला होता. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.