breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“अनिल देशमुख असंच मधे बोलले होते; आता आतमध्ये जात आहेत,” मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरुन गदारोळ

मुंबई |

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं. सभागृहाचं कामकाज सुरु होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला.

  • काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार

विधानसभेचं कामकाज परंपरेनुसार झालं पाहिजे असं सांगत सुधीर मुनगंटीवार नियमांचा दाखला देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सुधीर मुनगंटीवार संतापले. विधानसभा नियमाच्या संदर्भात हरकतीचा मुद्दा आहे असं सांगताना सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख असे मधेच बोलले होते, आता आतमध्ये जात आहेत. तुम्ही मधे बोलू नका, काही कारण नाही सरकारची चमचेगिरी करण्यासाठी असं वक्तव्य केलं.

  • नाना पटोले यांचा आक्षेप

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरकत घेतली. “मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांनी असाच विरोध केला म्हणून जेलमध्ये जात असल्याचं म्हटलं आहे. हे काय धमकी देत आहेत का ? सभागृहात धमकी दिली जात आहे. काय सुरु आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

  • नवाब मलिक संतापले

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनीदेखील हरकत घेताना म्हटलं की, “एखादा आमदार सत्ताधारी पक्षाचा असेल तर त्याला बोलण्याचा अधिकार आहे. मुनगंटीवार यांनी चमचेगिरी सुरु आहे का असा उल्लेख करणं योग्य नाही. हे शब्द रेकॉर्डवरुन काढून टाकावेत. यापुढे असं बोलणार नाही असी समजदेखील द्या”.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button