breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आनंदवार्ता ः मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सीचा 1 नोव्हेंबरपासून शुभारंभ; ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सीच्या प्रवासाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 नोव्हेबरपासून ही वॉटर टॅक्सी सुरू होणार असून, यासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणीला सुरूवात केली आहे.

मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सीच्या प्रवासाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 1 नोव्हेबरपासून ही वॉटर टॅक्सी सुरू होणार असून, यासाठी नागरिकांनी ऑनलाईन नोंदणीला सुरूवात केली आहे. वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे.

१ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होत आहे. या वॉटर टॅक्सीच्या सेवेसाठी प्रवाशांना 400 रुपये मोजावे लागणार आहेत. याबाबत नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी माहिती दिली आहे.

त्यांच्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून जवळपास 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. तसेच या टॅक्सीमध्ये एसीचीही सुविधा आहे.

1 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वॉटर टॅक्सीसाठीचे बुकिंग 29 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. सुरुवातीच्या काळात टॅक्सी सेवा सकाळी 10:30 वाजल्यापासून मुंबई क्रूझ टर्मिनलवरुन उपलब्ध होणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार या वेळेत बदल केला जाण्याची शक्यता आहे. गेट वे ऑफ इंडियावरुन टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी 8:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहिल.

जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरू केली होती. क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरू करण्यास नकार दिला होता. मात्र, मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सीचे वैशिष्ट्ये
टॅक्सीचे भाडे ४०० रुपये असेल.
दरदिवशी वॉटर टॅक्सीच्या एकूण 6 फेऱ्या होतील
मुंबई डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते मांडवा 3 फेऱ्या होतील.
मांडवा ते मुंबई डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनल 3 फेऱ्या होतील.
वॉटर टॅक्सीमध्ये 200 प्रवाशांसाठी आसनव्यवस्था.
भाऊचा धक्का ते मांडवा अशी सेवा असेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button