breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

Karnataka Polls : अपक्ष उमेदवाराने चक्क अर्ज भरायला आणली १० हजारांची चिल्लर

Karnataka Polls : कर्नाटकातील यादगीर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करताना अपक्ष उमेदवार यांकप्पा यांनी १०,००० रुपयांची अनामत रक्कम एक रुपयाच्या नाण्यांमध्ये भरली. १० मे रोजी कर्नाटक निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील लोकांकडून नाणी गोळा केली.

मी माझे जीवन माझ्या समाजातील लोकांसाठी आणि गावकऱ्यांसाठी समर्पित करीन. मी रिटर्निंग ऑफिसरकडे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचे पोस्टर लिहून आलो आहे, असे यंकप्पा यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे आणि १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. सध्याच्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ २४ मे २०२३ रोजी संपणार आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मंगळवारी ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना हुबळी-धारवाड-मध्यमधून तिकीट मिळाले आहे.

यावेळी, मकरंद अनासपुरे यांच्या “गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुरा” या गाजलेल्या मराठी चित्रपटाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. या चित्रपटामध्येही अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं आहे. असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडला आहे. या प्रकारामुळे यंकप्पा हे चर्चेत आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button