Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा’; पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ : यंदाच्या विभागीय महसूल महोत्सवाचे यजमानपद यवतमाळ जिल्ह्याला मिळाले असून या महोत्सवांतर्गत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. या स्पर्धांच्या माध्यमातून सर्वांनी नवी ऊर्जा आणि नवा संकल्प घेऊन आपल्या शासकीय कार्यात मोठे योगदान द्यावे आणि अमरावती विभागाचे राज्यस्तरावर नावलौकिक करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित या विभागीय महसूल महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय अपर आयुक्त अजय लहाने, संजय जाधव, सुरज वाघमारे, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, महसूल संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले की, महसूल विभागावर नेहमीच कामाचा मोठा ताण असतो. तरीही त्यांना सोपवलेली कामे तत्परतेने आणि चोखपणे पार पाडतात. या दगदगीच्या दिनक्रमाला दूर सारत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून महसूल परिवारातील संबंध अधिक दृढ व्हावेत, आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या निर्मितीसाठी नवचैतन्य मिळावे हाच या महोत्सवाचा उद्देश आहे.  शासनाचा कणा असलेला महसूल विभाग या स्पर्धांमधून अधिक ऊर्जावान आणि सजग बनल्यास महोत्सवाची फलश्रुती ठरेल. हा महोत्सव महसूल प्रशासनाला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –  आता सरपंचच असणार प्रशासक! राज्य सरकारचा मोठा निर्णय

जिल्हाधिकारी विकास मीना म्हणाले की, महसूल महोत्सवांतर्गत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे चांगले नियोजन व व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा महसूल विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीची मोठी संधी आहे. या स्पर्धांमधून महसूल यंत्रणेत आत्मविश्वास आणि समर्पण भावना जागृत होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दि. २१, २२ आणि २३ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात क्रिकेट, फुटबॅाल, टेनिस, खो-खो आदी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या महोत्सवाची सुरुवात ध्वजारोहणाने आणि मशाल पेटवून करण्यात आली. तसेच आदिवासी संस्कृतीचे पारंपरिक नृत्याद्वारे सादरीकरण करण्यात आले.

या विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे महसूल विभाग सहभागी झाले असून या स्पर्धेअंतर्गत पथसंचनाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी या पथसंचलनाला पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी मानवंदना दिली. तसेच या पथसंचलन स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल ठरल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button