‘..टिल्याला सोबत आणायला विसरू नका’; आशीर्वाद यात्रेवरून अमोल मिटकरींचा राणेंना टोला
![Amol Mitkari said don't forget to bring Tillya along](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/amol-mitkari-780x470.jpg)
मुंबई : भारतीय जनता पार्टीने आजपासून आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. आज पहिल्या दिवशी मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघात भाजपाची ही आशीर्वाद यात्रा जाणार आहे. त्यानंतर ९ आणि ११ मार्च रोजी दोन्ही दिवशी प्रत्येक दोन मतदारसंघात भाजपाची ही यात्रा जाणार आहे.
भाजपच्या या यात्रेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्रद्रोह्यानो आशीर्वाद यात्रेत शेतकरी कांदे मारून तुम्हाला आशीर्वाद द्यायला उत्सुक आहेत. तुम्ही आशीर्वाद यात्रा काढून सुरूवात करा जनता तुमच्या पक्षाची प्रेतयात्रा काढून शेवट करतील, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्र द्रोह्यानो आशीर्वाद यात्रेत शेतकरी कांदे हाणून तुम्हाला आशिर्वाद द्यायला उत्सुक आहेत . तुम्ही सुरुवातीला यात्रा काढा पण शेवट तुमच्या पक्षाची प्रेतयात्रा काढून शेतकरी समारोप करतील.. मागची जन आशिर्वाद यात्रा आठवा, सोबत टिल्ल्याला आणायला विसरू नका, असा टोला अमोल मिटकरी यांनी निलेश राणेंना लगावला आहे.