अमोल कोल्हे भाजपात जाणार? कोल्हेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया..
![Amol Kolhe said that he will talk about it in detail on 17th](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/amol-kolhe-1-780x470.jpg)
पुणे : अमोल कोल्हे भाजपात आले, तर चांगलीच गोष्ट आहे. आमच्या दृष्टीने शिवसेना-भाजपा युती वाढणं महत्त्वाचं आहे. अमोल कोल्हे कोणत्या मतदारसंघातून उभे राहतात? त्यावर मी त्यांचा प्रचार करणं अवलंबून आहे, असं माजी खासदार आणि शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. यावर आता अमोल कोल्हे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. आढळराव पाटील यांच्याशी शेवटची भेट शिवनेरीवर झाली होती. १७ तारखेला सविस्तर यावर बोलेन.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार हे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार आहेत की नाही यावर बोलणं योग्य नाही. गेली सहा दशके झालं महाराष्ट्रातील राजकारण शरद पवार यांच्या भोवती फिरत आहे. एक कार्यकर्ता म्हणून शरद पवार यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं.
महाराष्ट्रातील राजकारण हे शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भोवती अनेक दशके फिरत असल्याचे आपल्या पिढीने पाहिले. शरद पवार यांनी जो निर्णय घेतला आहे हे बघता, दिल की सुने या दिमाग की असा पेच निर्माण झाला आहे. पण, उद्या (शुक्रवारी) शरद पवार हे पूर्ण विचारांती निर्णय घेतील, असं अमोल कोल्हे म्हणाले.