‘प्रफुल्ल पटेलांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध’; ठाकरे गटाचे फडणवीसांना पत्र
![Ambadas Danve said Praful Patel's relationship with Dawood and his henchmen](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Devendra-Fadnavis-and-Uddhav-Thackeray-780x470.jpg)
नागपूर : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला नवाब मलिकांचा मुद्दा जोरदार गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना सरकारमधील समावेशाला विरोध दर्शवला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहीत याबाबतची नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र त्यांनी ट्विटरवरही पोस्ट केलं. यावरून आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे. ते म्हणाले, विधानसभा सदस्य नवाब मलिक यांच्याबाबत आपण व्यक्त केलेल्या तीन भावना वाचून आनंद झाला. नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याने त्यांना अजित पवार यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्यास आपण विरोध केला. आपण नैतिकता व राष्ट्रवाद याबाबत किती पक्के आहात हे यातून दिसले. पण अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.
हेही वाचा – रेपो दरात कोणताही बदल नाही, रेपो दर ६.५ टक्क्यांवरच; RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांची माहिती
नवाब मलिक ह्यांच्याबाबत जशा तीव्र भावना आहेत तशाच दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेल ह्यांच्याबाबतही आहेत का, अशी विचारणा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ह्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे केली.@iambadasdanve pic.twitter.com/XCcY5O4DLy
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 8, 2023
गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेल यांचे दाऊद व त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत व दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ईडीने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीन भावना आहेत. तशाच भावना, प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? याचा खुलासा आपल्याकडून होणे गरजेचे आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.