सर्व उलगडा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच होईल; राम शिंदे यांचा पुन्हा एकदा विखेंवर निशाणा
माझ्या घरगुती कामामुळे मी मुंडे यांच्या दौऱ्याला पाथर्डीला येऊ शकलो नाही : राम शिंदे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/vikhe-ram-shinde-mt53Xi.jpeg)
अहिल्यानगर: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षातील जे विषय आहेत. त्याचा सर्व उलगडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच होईल. मी ते मुद्दे जाहीर करेन, असे वक्तव्य भाजपचे आमदार राम शिंदे यांनी नगर येथे केले. मला विखेंनी जामखेड कर्जतचा दौरा आहे, याची पूर्वकल्पना दिली असती तर बरं झालं असते, असा टोलाही लागला. माझ्या घरगुती कामामुळे मी मुंडे यांच्या दौऱ्याला पाथर्डीला येऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगर येथे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये व येथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या संदर्भामध्ये आमदार राम शिंदे यांनी वाड्या पार्क मैदानामध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आमदार राम शिंदे म्हणाले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे माझ्याकडे आले होते. आम्ही काही विषयावर बोलणी केली. मात्र यातील कुठलेच विषय हे स्थानिक पातळीवर सुटणारे नाहीत. पाच वर्षाच्या विषयासंदर्भामध्ये आम्हाला बोलायचे असल्यामुळे जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोरच होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. नाराजी संदर्भात मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर फडणवीस यांच्या स्तरावरच चर्चा होईल. त्यानंतर ते मुद्दे काय होते ते मी स्पष्ट करेल असे ते म्हणाले.
भाजपाने सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला मी त्यांची उमेदवारी मान्य केली, असे सांगून मी सुद्धा माझ्या उमेदवारीसाठी दावेदार होतो. मात्र पक्षाने जो निर्णय घेतला, तो मला मान्य आहे. असे असतानाही जर मला कर्जत जामखेडच्या दौरा संदर्भामध्ये पूर्वकल्पना दिली असती तर बरे झाले असते. मात्र मी बाहेरगावी असल्यामुळे मला त्या ठिकाणी जाता आले नाही असेही ते म्हणाले. आजही माझ्या घरगुती कामामुळे मला पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याला जाता आले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
पारनेरचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके महायुतीचा भाग आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याला मी गेलो होतो. हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्याच्या कार्यक्रमास गेल्यावर चांगले बोलले पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे या भूमिकेतून मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, पण महायुतीचा उमेदवार ठरवण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. राज्याचे वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे आमदार लंके यांच्या सद्य भूमिकेबद्दल मी काही बोलू शकत नाही. वरिष्ठ नेतेच तो प्रश्न सोडवतील, असेही शिंदे म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. मागील दोन वर्षापासून याबाबत चौकशी सुरू होती, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली, तर पोळी भाजण्याचे काम काँग्रेस करीत आहे. केजरीवालांनी केलेला गुन्हा व केलेला भ्रष्टाचार यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. केवळ त्यांच्यावरील कारवाईला विरोधकांकडून राजकीय रंग दिला जात आहे, असा दावाही शिंदे यांनी केला. भारतीय जनता पार्टीने राज्यामध्ये जी काही उमेदवारांची घोषणा केलेली आहे ती घोषणा योग्य वेळेला झालेली आहे ,यावर मला अधिक भाष्य करायचे नाही असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षातील जे विषय आहेत. त्याचा सर्व उलगडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच होईल. मी ते मुद्दे जाहीर करेन, असे वक्तव्य भाजपचे आमदार राम शिंदे यांनी नगर येथे केले. मला विखेंनी जामखेड कर्जतचा दौरा आहे, याची पूर्वकल्पना दिली असती तर बरं झालं असते, असा
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व सुजय विखे यांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षातील जे विषय आहेत. त्याचा सर्व उलगडा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच होईल. मी ते मुद्दे जाहीर करेन, असे वक्तव्य भाजपचे आमदार राम शिंदे यांनी नगर येथे केले. मला विखेंनी जामखेड कर्जतचा दौरा आहे, याची पूर्वकल्पना दिली असती तर बरं झालं असते, असा टोलाही लागला. माझ्या घरगुती कामामुळे मी मुंडे यांच्या दौऱ्याला पाथर्डीला येऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.