सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत?

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्याच भागातील लाभार्थी महिलांची फेरतपासणी होणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. तसेच अद्यापही काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. मात्र त्या अर्जांची देखील आता छाननी काटेकोर पद्धतीनं होणार आहे.
कोणत्या महिला अपात्र ठरणार?
- वार्षिक एकत्रित उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल,तर अपात्र ठरणार.
- आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील.
- ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही..
- या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे.
- ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तर अशा महिला अपात्र ठरतील.
- तसेच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
हेही वाचा – ‘तीन महिन्यांत राज्यातील सरकार पडणार’; शरद पवार गटाच्या आमदाराचा मोठा दावा
दरम्यान, जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून आतापर्यंत २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. तब्बल दोन कोटी ३४ लाख बहिणींना ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर पर्यंतचे प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा केले गेले होते.तसेच डिसेंबरचा हप्ता देखील नुकताच बँकेत जमा करण्यात आलाय.





