breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक

  • मनसेचे आंदोलन

नगर |

शहरातील बाजारपेठ बंद असताना दुसरीकडे दारू दुकानातून खुलेआम दारू विक्री होत आहे, राज्य सरकारने घरपोच दारू विक्रीस परवानगी दिल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज, शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्याचे आंदोलन केले. मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहराध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

भुतारे यांनी सांगितले,की करोना महामारी काळात महाविकास आघाडी सरकारने टाळेबंदी लागू करत बाजारपेठा, दुकाने बंद केली. फक्त दारूविक्री चालू ठेवली. घरीच दारु विक्रीस परवानगी दिली. बाजारपेठेच्या दुकानातील कामगारांना दोन ते तीन महिने पगार नाहीत. त्यांना शासनाने कोणतीही मदत केली नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री करायची, असे सरकारचे धोरण आहे. शहरांत १० हजार रिक्षाचालक आहेत. त्यातील केवळ ५०० जणांना सरकारने मदत केली आहे. सरकारने योग्य नियोजन करून बाजारपेठ त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा रास्तारोको आंदोलन केले जाईल.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button