ताज्या घडामोडीपुणेराजकारण

अजितदादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही

बजरंग सोनवणेंचा अजित दादांवर घणाघात, बीडमधील निवडणूक प्रतिष्ठेची

बीड : राज्यातील चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बीड जिल्ह्यात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे (विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याने बीडमधील निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून सांगता सभेसाठी दिग्गज बीडच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीत पंकजा यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. त्याच्या कारखान्यासाठी निधी देण्याचं काम मी केलं. कारखान्याची कपॅसिटी वाढवून दिली, असे अजित पवारांनी म्हटलं होतं. आता, बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं आहे.

बीडमध्ये बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ सांगता सभेसाठी शरद पवार आवर्जून उपस्थित आहेत. येथील लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टोकाला गेल्याने यंदाच्या निवडणुकीत जातीय कार्ड महत्त्वाच ठरणार आहे. त्यातच, पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी आज अजित पवार व उदयनराजेंनी सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी, धनंजय मुंडेंचा दाखला देत बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला. आता, बजरंग सोनवणेंचीही जशात तसं उत्तर देत अजित पवारांवर पलटवार केला आहे.

बजरंग सोनवणेंनी लेकाचं काढलं
अजित दादांनी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन मला लोन दिलं असं भाषणात सांगितलं. मग, त्यांच्याच कारखान्याला अजितदादांनी का लोन दिलं नाही, असा प्रश्न सोनवणेंनी उपस्थित केला. तसेच, माझ्या मुलीला पराजित करण्याचं काम धनंजय मुंडे यांनीच केल्याचही ते म्हणाले. तर, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित दादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही. आमचं माप काढू नका, तुमचं माप बीड जिल्ह्यातील जनता काढल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बजरंग सोनवणेंनी अजित पवारांवर पलटवार केला, तर धनंजय मुंडेंनाही भाषणात लक्ष्य केलं.

अजित पवारांनी लेकीचं काढलं
पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, अशी मागणी करायचा. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी वाढवून द्यायला सांगितली. मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. धनुभाऊला कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते,तू माझा सल्ला घेत जा, असे अजित पवारांनी म्हटले होते. तसेच, बजरंग सोनवणेला पंचायत समितीमध्ये स्वत:ची मुलगी निवडून आणता आली नाही, अशी बोचरी टीकाही बजरंग सोनवणेंनी केली होती. त्यावर, आता सोनवणेंनेही पलटवार केला आहे.

दोन पैसे हाती आले की मस्ती येते
बजरंगा तू सांगायाचा छाती फाडली की हे दिसतो, तो दिसतो.. अरे छाती फाडू नको छाती फाडली की मरून जातो… तू स्वत:ला हनुमान समजायला लागला.. बजरंग सोनवणेचा बार्शी आणि बीडमध्ये कारखाना आहे. सगळ बरं चाललं होतं, त्याला काय अवदसा आठवली काय माहिती आणि निवडणुकीला उभा राहिला. परंतु काहींना दोन पैसे हाती आले की मस्ती येते, तशी मस्ती त्याला आली, असे म्हणत अजित पवारांनी बजरंग सोनवणेंवर हल्लाबोल केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button