breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अजित पवारांचा जे.पी. नड्डांवर हल्लाबोल

मुंबई । महाईन्यूज ।

भारतातल्या आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष त्यांनाच त्यांचं राज्य टिकवता येत नाही. हिमाचल प्रदेश हे जे.पी. नड्डा यांचं राज्य आहे. ते त्याठिकाणाहून भाजपचं अध्यक्षपद भूषवतात. ही त्यांची नामूष्की नाही का?, हे सर्व होत असताना आप, भाजपा आणि काँग्रेसला किती मतं पडली यासंदर्भातील आकडे समोर आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर केला आहे.

१७ तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रद्रोही सरकाविरोधात विराट मोर्चाच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीने बैठक घेतली. यावेळी बैठकीत उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, एकीकडे शांततेचं आवाहन करतात आणि दुसरीकडे भडका उठेल अशा बाबी घडत आहेत. कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते हम करे सो कायदा असं वागत आहेत. वर्षानुवर्ष तिथली गावे महाराष्ट्रात येण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभेचे अध्यक्ष म्हणतात की, हे दोन्ही राज्यांनी प्रश्न सोडवावा. मात्र, हे शक्य नाही. केंद्राने हा प्रश्न सोडवणे गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही हल्लाबोल आंदोलन पुकरालं आहे, असं अजित पवार म्हणाले.

आमच्या कार्यकाळात कधीच सीमा भागाचा विषय आला नाही. आता ही भावना त्या लोकांच्या मनात निर्माण होण्याला हे सरकार जबाबदार आहेत. हे कमी पडले आहेत. हे मान्य करत नाहीत. हिमाचल प्रदेश नड्डा यांचं राज्य आहे ते त्यांना टिकवता आलं नाही. याचा कमीपणा वाटत नाही का? सरकारी नोकरदार यांच्या पगारासाठी कर्नाटक बँकेचे नाव देण्यात आले आहे. आम्ही त्याला परवानगी दिली असं देवेंद्र फडणवीस म्हणाले हे धांदात खोटं आहे. माझी माहिती आहे ही फाईल एका दिवसात क्लिअर झाली आहे. कर्नाटक बँकेचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला नव्हता. देवेंद्र फडणवीस यांनी असं खोटं बोलणं योग्य नाही. एका दिवसात फाईल कोणी फिरवली याची माहिती आम्ही आरटीआयच्या माध्यमातून मागणार आहे, असंही पवार म्हणाले.

प्रकरण 2 राज्यांपुरते नाही
हे प्रकरण केवळ दोन राज्यांनी बघण्यासारखे नाही. भाजपच्याच नेतृत्वात केंद्र व दोन राज्यात सत्ता आहेत. महापुरुषांचा वारंवार अपमान, त्यातून वक्तव्याची पुनरावृत्ती, सीमावादातून महाराष्ट्रातील लोक, वाहनांवरील हल्ला या मुद्द्यावर आमचा मोर्चा आहे, असं अजित पवार म्हणाले

महाराष्ट्रद्रोहीविरोधांत हल्लाबोल
काही गावे जर दुसऱ्या राज्यात जाण्याची भाषा करीत असतील तर त्या लोकांच्या मनात राज्यातील सरकारबद्दल विश्वास राहीलेला नाही. मविआच्या काळात या मागण्या झाल्या नाहीत. कर्नाटक, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारही द्रोह्यांसारखे वागत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रद्रोहीविरोधांत हल्लाबोल असा आमचा मोर्चा आहेत, असं अजित पवार म्हणाले

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button