Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांची मोठी राजकीय खेळी! जयंत पाटलांच्या कट्टरविरोधकाकडे सोपवली मोठी जबाबदारी, थेट प्रदेश उपाध्यक्षपदी केली नियुक्ती

Shivajirao Naik : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आत्तापासून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. येत्या काही महिन्यांवर राज्यात स्थानिक पातळीवरील निवडणुका होणार आहेत. अशातच राजकीय पक्षातील अनेक बड्या नेत्यांकडे मोठी जबाबदारी सोपविण्यात येत आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्थानिक पातळीला केंद्र केले आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्याकडे पक्षाने आगामी स्थानिक निवडणुकींच्या अनुषंगाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांंनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत देण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

हेही वाचा –  पोलिस आयुक्तांनी जाणून घेतल्या तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या

शिवाजीराव नाईक यांना प्रशासनातील गाढा अभ्यास असून त्यांनी 13 वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेक कामे केली आहेत. पाच वर्ष बांधकाम राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे. यामुळे अजित पवार यांनी नाईक यांना राज्यात काम करण्याची संधी दिली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी वयस्कांनी आता मार्गदर्शनाच्या भूमिकेत यावे आणि पक्षासाठी काम करावे. तुमच्या अनुभवाचा योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्याही दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातून येतात. याच जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या शिवाजीराव नाईक यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. ही अजित पवारांची राजकीय खेळी असल्याची चर्चा होत आहे. यामुळे आता अजित पवारांनी जयंत पाटलांना स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर नवे आव्हान निर्माण केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button