breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे पुन्हा एकदा राज्यात नवीन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो, असं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील आणि बाबुराव अत्राम या आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील

अजित पवार यांच्या बैठकीत दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, किरण लहमाटे, सरोज अहिरे, अशोक पवार, अनिल पाटील, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा, अनुल बेणके, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, निलेश लंके, मकरंद पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सोबत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button