breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील

मुंबई : अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर आज सकाळपासून आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होणार आहेत. तसेच ते आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचंही बोललं जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही राजभवनाच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणारे गप्प का? राज ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील राजभवनावर दाखल झाले आहेत. ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्या राजभवनातील फोटो समोर आला आहे. तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल हे देखील राजभवनावर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button