कोण संजय राऊत? अजित पवारांनी उडवली खिल्ली
![Ajit Pawar said who is Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Ajit-Pawar-and-sanjay-raut-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सातत्यांने होत आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक हल्लाबोल पाहायला मिळत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी कोण संजय राऊत? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींना एका मुलाखतीत केला आहे.
अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत हे सल्ले देत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, कोण संजय राऊत? मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो. त्यामुळे कोणाला काही लागायचं काहीच कारण नाही.
मी निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा निवडणूक अधिकारी होईन तेव्हा मी नक्की सांगेन की निवडणुका कधी होतील. फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छूकंनी तयारी केली. देव दर्शन केले. निवडणुका काही झाल्या नाहीत. आता सर्व इच्छूक कंटाळले आहेत. प्रशांत जगताप यांचे भावी खासाद असे बॅनर लागले आहेत. प्रशांतला माझ्या शुभेच्छा.., असा टोला अजित पवार यांनी लगावला.