breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप झाले’; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडीओ ट्विट

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी नुकताच राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यावरून सध्या विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष व्हिडीओ संदेश जारी करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्त्वपूर्ण संदेश, अशा मथळ्याखाली एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अजित पवार म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे. असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. आजवर आपण पाहात आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वत:वरील खर्चाची काटकसर करून मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असते. पण आर्थिक अडचणींमुळे कधीकधी घरातल्या मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील.

हेही वाचा     –      पुणे शहर, जिल्ह्यातील २११ हॉटेल, बार रडारवर

अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे. काहींकडून तर या अर्थसंकल्पाला लबाडाच्या घरचं अवताण आणि यासारखी बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे. मला इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणारा आहे, असं अजित पवार म्हणाले.

मी गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याबदल्यात मला शिव्या-शाप मिळतायत. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दु:ख आणि वेदना समजून घेतल्या. सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं आहे. हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिलं याला त्यांचा विरोध का? यावरून कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button