breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? अजित पवार म्हणाले,..

२०१९ मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर आघाडी केली

मुंबई : अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार गट भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचाच आहे असा आरोप काही नेत्यांनी केला आहे. दरम्यान, यावरून अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांच्या संमतीशिवाय घेतला का? असा प्रश्न विचारला असता. अजित पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करायचा असतो. लोकशाहीची हीच खरी पद्धत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी बहुमताने हा निर्णय घेतला असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर; म्हणाले, मी कृषीमंत्री असताना..

शरद पवार हे कोल्हापूर येथे सभा घेणार आहेत. यावरून अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, शरद पवारांनी कुठे सभा घ्यावी? हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला जे योग्य वाटतं, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अनेक वर्षे सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. प्रशासनावर पकड असणारे कार्यकर्ते आहोत. तुम्ही कुणालाही खासगीत विचारा… आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका. शेवटी सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबवायची असते. काही वेळेस विचारधारा वेगवेगळी असू शकते.

२०१९ मध्ये सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची विचारधारा बाजुला ठेवून शिवसेनेबरोबर आघाडी केली. शिवसेना आणि भाजपा २५ वर्षांपासून मित्रपक्ष होते. भाजपाबरोबर २५ वर्षे युती केलेला मित्रपक्ष अडीच वर्षे चालू शकतो. तर मग पुढच्या काळात युतीतील दुसरा राहिलेला मित्रपक्ष (भाजपा) तोही चालून घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही शरद पवारांपेक्षा काही वेगळी भूमिका घेतलीय, असं दाखवण्याचं काही कारण नाही, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button