अजित पवार पुन्हा अडचणीत.. मोक्का कारवाईतून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात दिली कबुली
![Ajit Pawar said that bullying and bullying will not work](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Ajit-Pawar-3-780x470.jpg)
पुणे | अजित पवार काल बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामतीमध्ये त्यांना संभाचा धडाका लावला होता. मतदारांशी थेट संपर्क साधला. शरद पवार गटाकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असणार आहेत. यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा बारामतीमध्ये सामना रंगणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे.
अजित पवार म्हणाले की, आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही. मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही दादा तुम्ही एवढ कडक वागतात आणि अशा गोष्टीला कस पाठीशी घालतात? तेव्हा माझापण कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते.
हेही वाचा – ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, मागून धक्का दिल्याचा डॉक्टरांचा खुलासा
अहिल्याबाईंनी चांगल काम केलं,कारभार चांगला केला, त्यामुळे अहमदनगर जिल्हा तालुका नाव बदललं आणि अहिल्यानगर नाव दिलं.आपण सरकारमध्ये नसतो तर उन्हाळ्यात पाणी मिळालं नसत,दुष्काळ पडला आहे. अनेक विकास कामे सुरू आहेत. कुठल्या कामाला पैसे मिळाले नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर पैसे देण्यात येतील. गाय दूध दर वाढ राज्य सरकार देत आहे, दुधात मिक्सिंग दुधात करू नका, असाला पैसा टिकत नसतो, भेसळ युक्त घालू नका, असं अजित पवार म्हणाले.
उसाचा दर यंदा मोदी सरकार यांनी वाढवला आहे. आपल्यावर आय टी ची १० हजार कोटी कर्ज होते मोदी आणि अमित शाह यांनी साखर कारखाने पैसे कमी केले. रात्री १० वाजायच्या आत सभा संपावयाच्या आहेत. अजून दोन सभा आहेत. नेहमी मला तुम्ही भरभकम पाठींबा दिला. राज्याच्या भल्या करता काही राजकीय निर्णय घ्यावा लागला. मी अनेक वर्षी काम करतोय.काही लोक निवडणूक काळात भाव वाढवून देतात आणि अडचणीत येतात, असंही अजित पवार म्हणाले.