अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला विजयी आघाडी
पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव, शरद पवारांना मोठा धक्का
बारामती : बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलला विजयी आघाडी मिळाली आहे. अजित पवारांच्या पॅनलचे 21 पैकी 12 उमेदवार विजयी झाले आहेत, तर शरद पवारांना मोठा धक्का बसला असून पॅनलमधील सर्वच उमेदवारांचा पराभव झाला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाण्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने बळीराजा सहकार पॅनल उभा केला होता. या पॅनलचे नेतृत्व युगेंद्र पवार करत होते, मात्र या पॅनलमधील सर्वच पराभव झाला आहे. शरद पवारांच्या होमटाऊनमध्ये शरद पवारांना बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांच्या आणीबाणीच्या लेखावर शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आज निवडणूक आयोग…
बारामती सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत, अजित पवारांनी निळकंठेश्वर पॅनल उभा केला होता. या पॅनलच्या 21 पैकी 12 उमेदवारांनी आतापर्यंत विजय मिळवला आहे. तर 7 उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे या निवडणुकीत अजित पवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ‘ब वर्ग’ गटातून विजयी झाले आहेत.
किती पॅनल रिंगणात?
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी कारखान्याला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते, ज्याचा परिणाम मतदानावर पाहायला मिळत आहे. आतापर्यंतची परिस्थिती लक्षात घेता अजित पवार यांच्या पॅनलला मोठे यश मिळणार असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनल, शरद पवारांच्या नेतृत्वाखालील बळीराजा सहकार बचाव पॅनल, भाजप नेते चंद्रराव तावरे-रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनल अशी चार पॅनल रिंगणात होती. आता सर्वांच्या नजरा अंतिम निकालाकडे लागल्या आहेत.





