breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्याचे आंदोलन; पिंपरी ते विधानसभा पायी वारी करणार

महापालिका कर्मचारी योगेश रसाळ व प्रशांत भिसे पायी मुंबईला रवाना

पुणे : संपूर्ण राज्यभर सद्यस्थितीत गाजत असलेला शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील सर्वात ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणे. याच मुद्द्याला अनुसरून येत्या १४ मार्चला राज्यभरातील विविध स्तरातील सर्वच शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याबाबतचा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे. त्याच धर्तीवर त्यांना पाठिंबा दर्शविण्याकरिता महानगरपालिका नगरपालिका व इतर निमशासकीय संस्था देखील सदर संपत सहभागी होत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नोव्हेंबर २००५ नंतर स्थायीसेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील सद्यस्थितीत नवीन म्हणजेच परिभाषित अंशदान पेन्शन योजना लागू आहे. सदर कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वी रुजू झालेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामगार प्रतिनिधी योगेश पांडुरंग रसाळ व प्रशांत वामन भिसे हे दोघे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आज दिनांक १० मार्च रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते विधान भवन मुंबई अशी पायी प्रवास करून जाणार आहेत.

जेणेकरून २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवरील लाभलेल्या अंशदान पेन्शनचा अन्याय दूर होईल व त्यांना देखील इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल.

सदर संकल्प यात्रेत महानगरपालिकेतील इतरही कर्मचारी वेगवेगळ्या टप्प्यांवर सामील होत असून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी ते विधान भवनाच्या दालनात पोहोचतील. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी उचललेल्या पावलांचे संपूर्ण महापालिकेच्या स्तरावरून सर्वच कर्मचाऱ्यांच्या तोंडून कौतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button