breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Raj Thackeray : पटण्यातील बैठकीनंतर राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

मुंबई : भाजपविरोधात पाटणा येथे विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसेच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी झाली होते. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जुना एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

राज ठाकरे या व्हिडीओमध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्याबद्दल बोलत आहेत. ही मुलाखत सप्टेंबर २०१७ ची आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले होते की, कोणची सत्ता आज येते, कोणाची उद्या जाते. कोणा दुसऱ्याची सत्ता उद्या येते. परंतु ही सत्ता टिकवण्याचा सगळेजण प्रयत्न करत असत. राजकीय पक्ष, मग तो कुठलाही असो, तो पक्ष ती सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा – पंकजा मुंडे यांना BRS पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

https://rb.gy/tksvd

मला माहितीय त्याप्रमाणे, विरोधी पक्ष हा कधीच जिंकत नसतो. सत्ताधारी हरत असतात. ज्या दिवशी तुमच्या हातात पूर्ण सत्ता येते ती त्या क्षणाला जायची सुरूवात देखील होते. आता सत्ता जायची ही जी गोष्ट आहे ती तुम्ही किती ताणताय एवढच तुमच्या हातात असतं. म्हणजेच ती सत्ता किती पुढे नेताय हेच तुमच्या हातात असतं, असं राज ठाकरे म्हणाले.

तुम्ही ती सत्ता पुढे नेत असताना किंवा ती वाढवत असताना तुम्ही कुठलेही चुकीचे पायंडे पाडले नाहीयेत ना याचं तुम्हाला भान असलं पाहिजे. सत्ता टिकवण्यासाठी चुकीचे पायंडे पाडू नये याचं भान प्रत्येक राजकीय पक्षाने ठेवलं पाहिजे. आजपर्यंत सत्ता टिकवण्यासाठी ज्या ज्या पक्षाने चुकीचे पायंडे पाडले ते आज हा देश भोगतोय. अगदी व्ही. पी. सिंह यांच्यापासूनची उदाहरणं घ्या. आपलं राज्य टिकवण्यासाठी, आपली सत्ता टिकवण्यासाठी आपण चुकीचे पायंडे देशात पाढतोय ज्याचा फटका पुढच्या पिढ्यांना बसेल. याची काळजी घेतली पाहिजे. कारण उद्या जेव्हा सत्ताबदल होईल तेव्हा आणि जे दुसरे सत्तेत येतील ते दुपट्टीने बदला घेतली, असं राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button