breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिंदे सरकारमधील पहिली महिला मंत्री म्हणून आदिती तटकरेंनी घेतली शपथ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये महिला मंत्री नसल्यामुळे विरोधीपक्षाकडून वारंवार टीका केली जात होती. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिली महिला मंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे यांनी आज शपथ घेतली आहे.

हेही वाचा – ‘अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला’; शरद पवारांचा आरोप

https://twitter.com/MahaDGIPR/status/1675470772595306497

दरम्यान, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे बहुसंख्य आमदार सहभागी झालो आहोत. त्यानुसार मी आणि इतर सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. पुढच्या सर्व निवडणुका पक्षाच्या नाव व चिन्हाखाली लढवणार आहोत. त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही जर शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, तर आम्ही भाजपाबरोबरही जाऊ शकतो. नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो, तर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही इथेही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button