breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

जया बच्चन यांच्यानंतर आता अभिनेता अभिषेक बच्चनही राजकारणात येणार?

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताब बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन आता राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. आपल्या आई वडिलांप्रमाणेच अभिषेक बच्चनही राजकारणाल प्रवेश करणार आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार अभिषेक बच्चन आपल्या आईप्रमाणे समाजवादी पार्टीत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. अभिषेक बच्चन समाजवादी पक्षात सहभागी होणार असून २०२३ मध्ये अलाहबादमधून निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याची जोरदार चर्चा होती. अभिषेकच्या जवळच्यांनी मात्र या बातमीमध्ये काहीच तथ्य नाही. या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – विधानसभा अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळेल? राज ठाकरे म्हणाले..

दरम्यान, अभिषेक बच्चन यांनी २०१३ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राजकारणात येण्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. एखाद्या राजकीय नेत्याची भूमिका अत्यंत उत्तमरीत्या साकारू शकेल, पण तो राजकारणात मात्र कधीच येणार नाही. अभिषेकचे वडील म्हणजेच महानायक अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये अभिनयातून ब्रेक घेऊन राजकारणात नशीब आजमावलं होतं. तर अभिषेकची आई जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button