Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरीतील वाघेरे कुटुंबीयांचा राष्ट्रवादीशी पुन्हा ‘संजोग’

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आंदोलनात पत्नी आणि मुलाचा सक्रिय सहभाग

पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक

मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केलेले माजी महापौर संजोग वाघेरे हे अजित पवार यांच्या संपर्कात असून ते पुन्हा स्वगृही म्हणजे राष्ट्रवादीत परततील अशी चर्चा थंड होत असतानाच आता पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे. नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसने डीपी प्लॅन विरोधात पुकारलेल्या आंदोलनामध्ये संजोग वाघेरे यांच्या पत्नी माजी स्थायी समिती अध्यक्ष उषा वाघेरे आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश वाघिरे आंदोलनात सक्रिय सहभागी झालेले पाहायला मिळाले.

दरम्यान या आंदोलनातील सक्रिय सहभागामुळे वाघिरे कुटुंबीयांचा राष्ट्रवादीशी ‘संजोग’ पुन्हा पाहायला मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र मध्ये प्रचंड प्रमाणात महाविकास आघाडीची लाट पाहायला मिळाली. अनेक दिग्गज या लाटेमध्ये स्वार झाले. खासदार होऊन संसदेत बसले. याच लाटेमध्ये स्वार होण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघांमधून माजी महापौर संजोग वाघिरे यांनी पक्ष बदलला. राष्ट्रवादीमध्ये अनेक पदे उपभोगली. घरामध्ये महापौरपदापासून स्थायी समिती पदापर्यंत अनेक पदे वाघिरे कुटुंबीयांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून मिळाली. मात्र महाविकास आघाडीची सुक्त लाट लक्षात घेत संजोग वाघिरे यांनी या मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट मिळवत निवडणुकीच्या मैदानात उडी मारली. मात्र शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात वाघिरे यांचा टिकाव लागू शकला नाही. मोठा मताधिक्याने त्यांना पराभवाचा सामना स्वीकारावा लागला.

हेही वाचा    :      भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता ‘‘दिल्ली पॅटर्न’’

या पराभवानंतर विधानसभेमध्ये भाजपा महायुतीला चांगलेच यश मिळाले. शहरातील एकंदर परिस्थिती लक्षात वाघेरे यांनी अजित पवार यांच्या गाठीभेटी सुरू केल्या यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये परतण्याबाबत चर्चा सुरू झाल्या.

अनेकांच्या भुवया उंचावल्या!

त्यातच गेल्या आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराच्या नवीन प्रारूप योजने विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन पुकारले. या आंदोलनामध्ये संजोग वाघिरे यांच्या पत्नी माजी स्थायी समिती अध्यक्ष उषा वाघिरे आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश वाघिरे सक्रिय सहभागी झालेले पाहायला मिळाले. यामुळे अनेकांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या. आगामी महापालिका निवडणूक कांच्या दृष्टिकोनातून वाघिरे कुटुंबीय पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी संजोग करून घेणार का अशीही चर्चा यांनी निमित्ताने रंगली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group