breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणसातारा

अभिजीत बिचुकले साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार, उदयनराजेंबद्दल म्हणाले..

मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं - अभिजीत बिचुकले

सातारा | लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर अनेकांची निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु झाली आहे. साताऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती यांचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू आहे. अशात देशाचं संविधान वाटचवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी केली आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले की, कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र घेऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे. येणाऱ्या लोकसभेला मी लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर करतो आहे. माझ्या संपूर्ण फॅन्सनी आणि सातारकरांनी माझा विचार करावा.

हेही वाचा     –      लोकसभा निवडणूक रणसंग्राम : मावळचा लोकसभेचा कारभारी बदलण्याची नांदी!

मी सातारा हे नाव जगाच्या नकाशावर नेलं आहे. मला आता यावेळी दिल्लीत काम करण्याची संधी द्या. उदयनराजे भोसले हे आमचे थोरले बंधू आहेत. राज्यसभेवर ते खासदार आहेत. त्यांना तिकिट मिळतं की नाही ते माहीत नाही. भाजपापुढे ते झुकतात? हा माझा प्रश्न आहे. माझे आचार आणि विचार सगळ्यांना माहीत आहे. मात्र मी स्पष्टपणे सांगतो आहे की मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे हे मी सांगू इच्छितो, असंही अभिजीत बिचुकले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button