‘संजय राऊतची अवस्था कुत्र्यासारखी’; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
पुणे : शिवसेना (ठाकरे गटाचे) मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्याने आमदारांचे हाल उकिरड्यावरच्या कुत्र्यापेक्षाही बेकार होणार आहेत, असं सामनातून म्हटलं आहे. बंड केलेल्या आमदारांची तुलना ही भटक्या कुत्र्यासोबत केली गेली आहे. दरम्यान, यावरून अब्दुल सत्तार यांनी प्रतिउत्तर देत खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले की, ज्या कुत्र्याला आम्ही आमच्या मतावर राज्यसभेत पाठवलं आणि त्यानंतर तो आम्हाला कुत्रा म्हणता असल तर त्याच्या सारखा महाकुत्रा कोणीच नसेल. तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा.
हेही पाहा – ‘द केरळा स्टोरी’ सिनेमा मोफत दाखवणाऱ्यांवर केदार शिंदे आक्रमक; म्हणाले,..
संजय राऊतांनी राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईल. राऊतांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं. राऊत याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येते. त्यांचा जर बिस्मिल्ला केला असता तर त्याला कोणी विचारले असते का? असा सवालही सत्तार यांनी केला.
धाकधूक आम्हाला नाही, धाकधूक त्यांना आहे. जसा निकाल लागेल तसे ते सगळे चालले जातील. चर्चेप्रमाणे त्यांच्याकडचे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्क करत आहेत. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय असेल तो आम्ही सन्मानाने स्वीकारू, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.