TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मणिपूरमधील अमानुष कृत्याविरोधात आम आदमी पार्टीची राज्यभर निदर्शने

सांगलीः

मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात त्रिव निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ही निदर्शने करण्यात आली. इस्लामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर देखील मनिपुर येथे घडलेल्या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध नोंदवला.

मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

मनिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.

यावेळी आप चे सांगली जिल्हा अध्यक्ष राम पाटील ,उपाध्यक्ष भगवान पाटील , तालुका अध्यक्ष जितेंद्र धनावडे , तालुका उपाध्यक्ष विकास पाटील,नंदकुमार भोसले,तानाजी जाधव,वाळवा तालुका युवा अध्यक्ष संकेत पाटील, वल्लभ पाटील, प्रतीक पाटील ,निखिल कलावंत,शिराळा तालुका अध्यक्ष कृष्णाजी कदम, राजेंद्र लुगडे,विलास मोहिते,शिवाजी पाटील हे सर्व उपस्थित होते .

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button