Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“संजय राऊत हे दुसरे अशोक खरात…”; अनिल पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई | नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आधीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असताना, आता या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांची तुलना अशोक खरात यांच्याशी केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. “संजय राऊत हे दुसरे खरात झाले आहेत,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्या अलीकडील विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांनी ज्या प्रकारे लोकांना खोटे भविष्य सांगून दिशाभूल केली, त्याचप्रमाणे राऊत सध्या राजकीय भविष्यवाणी करत असून तीही तितकीच भ्रामक असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

हेही वाचा     :          नाशिकमध्ये भीषण दुर्घटना; मोटार विहिरीत कोसळून नऊ जणांचा मृत्यू

शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर असतानाही संजय राऊत यांनी पारोळा, पाचोरा आणि मुक्ताईनगर येथील शिंदे गटातील काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया राऊत यांना थेट प्रत्युत्तर म्हणून पाहिली जात आहे.

“महाराष्ट्रात सध्या संजय राऊत यांच्यासारखे नेते स्वतःला मोठे भविष्यकार समजत आहेत. मात्र, त्यांनी इतर पक्षांबद्दल अंदाज व्यक्त करण्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. त्यांच्या पक्षातील अनेक आमदार आणि खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी आधी घर सांभाळावे, मग इतरांवर भाष्य करावे,” असे आमदार पाटील म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button