अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावे नवा विक्रम…
![A new record for Finance Minister Nirmala Sitharaman...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/12Nirmala-Sitaraman-780x470.jpg)
नवी दिल्ली ः निर्मला सीतारामन या आपल्या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत ज्यांच्या नावे सलग पाचवेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नोंद झाला आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करत आहेत. मोदी सरकार 2.0 आल्यापासून सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या देशाच्या सहाव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत.
कुणाच्या नावावर आहे हा रेकॉर्ड
माजी अर्थमंत्री अरूण जेटली, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम , यशवंत सिन्हा, मनमोहन सिंह आणि मोरारजी देसाई यांच्या यादीत आता सहावं नाव हे निर्मला सीतारामन यांचं असणार आहे. २०१४ मध्ये देशात मोदी सरकार आल्यानंतर अरूण जेटली यांनी सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला. अरूण जेटलींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे व्यापार मंत्री पीयूष गोयल यांनी २०१९-२० साठी अंतरिम अर्थसंकल्प किंवा मतदानाचा अहवाल सादर केला. सलग पाचवेळा अर्थमंत्री म्हणून केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड निर्मला सीतारामन यांच्या नावे नोंद झाला आहे.
पी चिदंबरम यांनी सलग पाच अर्थसंकल्प सादर केले आहेत
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी २००४ ते २००९ या कालावधीत सलग पाच अर्थसंकल्प सादर केले. तर भाजपाच्या नेतृत्वातील वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी १९९८ ते ९९ चे अंतरिम आणि अंतिम बजेट सादर केलं. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर १९९ ते २००० ते २००२-०३ असे चार अर्थसंकल्प सादर केले.
पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारच्या कार्यकाळात मनमोहन सिंह हे आपल्या देशाचे अर्थमंत्री होते. त्यांनी १९९१ ते १९९२ ते १९९५-९६ या कालावधीत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेला १९९१-९२ चा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेचे उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचा समावेश करून भारताला नवी दिशा देणारा ठरला.
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १० वेळा सादर केला आहे अर्थसंकल्प
आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त वेळेला अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम हा माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. १९६२ ते १९६९ या कालावधीत त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर पी. चिदंबरम यांच्या नावे नऊवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. तर प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांच्या नावे ८ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे.