TOP News । महत्त्वाची बातमीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व नियोजनासाठी बुधवारी महापालिकेत बैठक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त दरवर्षी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन करणेकामी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये बुधवार १२ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक होणार आहे. या बैठकीस शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.