TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

लढणाऱ्या माय-लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी; ऐश्वर्या रेणुसे- जगताप यांची हृदयस्पर्शी आदरांजली

आईच्या प्रचारासाठी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी

पिंपरी : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर आज दि. १५ फेबुवारी रोजी त्यांची पहिली जयंती ‘स्वाभिमान सप्ताह’ म्हणून साजरी होत आहे. प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम आणि भव्य- दिव्य कार्यक्रमांनी साजरा होणार वाढदिवस सोहळा यावर्षी जगताप कुटुंबीय आणि समर्थकांना करता येणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जगताप समर्थक आणि कार्यकर्त्यांसह कुटुंबीय या दु:खातून सावरले नाहीत. तोपर्यंत अल्पावधीतच चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. भारतीय जनता पार्टीकडून आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली.
निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेत आपल्या आईसोबत कणखरपणे दिवंगत जगताप यांची मुलगी ऐश्वर्या रेणूसे- जगताप हिसुद्धा खांद्याला खांदा लावून प्रचार करीत आहे. आपल्या वडीलांनी शहराच्या विकासासाठी दिलेले योगदान लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

वास्तविक, चिंचवड विधानसभा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध व्हावी. कारण, जगताप कुटुंबीयांमध्ये उमेदवारी देण्यात येणार असल्याचे भाजपाने जाहीर केले होते. मात्र, महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, दु:खाचा डोंगर पाठीवर टाकून जगताप कुटुंबीय आणि समर्थक प्रचारासाठी घरोघरी भेट देत आहेत.

दरम्यान, गेल्या ३५ वर्षांपासून शहराच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा, औद्योगिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे लक्ष्मण जगताप यांचा वाढदिवस प्रतिवर्षी दि. १५ फेब्रुवारी रोजी अत्यंत दिमाखात साजरा केला जात होता. यंदा त्यांची पहिली जयंती साजरी करावी लागेल आणि ते दु:ख पचवावे लागेल, या विचाराने जगताप कुटुंबीय आणि समर्थकांचे अश्रू दाटून येत आहेत.

वडीलांच्या निधनानंतर आपल्या आईच्या प्रचारासाठी दिवंगत जगताप यांची लेक ऐश्वर्या जगताप हिने पुढाकार घेतला आहे. जगताप आजारी असताना शेवटपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही लेक आता आपल्या आईला आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. आजवरच्या निवडणुकांमध्ये लढणारे पप्पा आपल्यासोबत नाही, या कल्पनेने ऐश्वर्या आणि कुटुंबीय अक्षरश: शोकमग्न आहेत. अशातच ऐश्वार्याने आपल्या वडीलांना आदरांजली वाहण्यासाठी भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. त्यामुळे ‘‘आईच्या प्रचारासाठी लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहानी…’’ आहे अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

आदरांजलीमध्ये एैश्वर्या म्हणतात…

पप्पा मी तुमची लाडकी लेख ऐश्वर्या…आयुष्यभर मला आणि मम्मीला आपल्या साऱ्या कुटुंबाला तळहातावरल्या फोडाप्रमाणे जपणारे वडील म्हणून खरंतर तुमचा सार्थ अभिमान वाटतो. तुम्ही सर्वकाही शिकवलं. पण, तुमच्याशिवाय कसं जगायचं हेच नाही शिकवलं. तुम्ही अकालीच आम्हाला पोरकं करुन सोडून गेलात आणि चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. तुमच्यावर प्रचंड प्रेम करणारे लाखो नागरिक डोळ्यांत आश्रू आणि उरात हुंदका घेवून मम्मीच्या पाठिशी ठामपणे उभे राहीले. त्यातच तुम्ही वरुन आम्हाला पाहताय, आम्हाला आशिर्वाद आणि लढण्याची हिम्मत देताय, असं सतत जाणवतं.. सक्रीय राजकारणामध्ये मम्मी आणि कामा नेहमीच तुमच्यासोबत ठामपणे उभे होते. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून जनतेच्या हितासाठी तुम्ही आयुष्य खर्ची घातले. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची हिच तळमळ आम्ही सर्वजण पाहत होतो. हाच तुमचा वारसा चिंचवड मतदार संघातील नागरिकांच्या आशिर्वादाने व मम्मीच्या मोठ्या हिंमतीने पुढे नेईल, असा आमचा ठाम विश्वास आहे.

पप्पा लहानपणापासून तुम्हाला जनतेसाठी अहोरात्र झटताना पाहिले आणि मम्मीला व काकांना खंबीरपणे तुमच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलेलं पाहिजे. या शहरातील प्रत्येक नागरिक माझं कुटुंब आहे, ही तुमची भावना संस्कार म्हणून तुम्ही आम्हाला दिली आणि आज पहा पप्पा तुमच्या आठवणींनी ओल्या झालेल्या लाखो डोळ्यांमध्ये आपल्या कुटुंबाबद्दलची प्रेमळ भावना दिसते. पप्पा एखाद्या मोत्याच्या माळेप्रमाणे व आपुलकीच्या धाग्यामध्ये या शहरातील माणासांना जोडून अस्सल दागिना घडवले. तुमचा खरंच सार्थ अभिमान वाटतो. तुमच्या पोटी जन्म घेण्याचे भाग्य मिळाले.

पप्पा बघा ना कसला दिवस आहे. आज १५ फेब्रुवारी तुमचा वाढदिवस. जो दिवस ऐव्हढी वर्ष आपण सर्वजण आनंदाने, उत्साहाने साजरा करायाचो. त्यात तुमच्या वाढदिवसाला तुमची जयंती म्हणायची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आज खूप भरुन आले आहे. आठवणींना बांध राहिला नाही. तुम्ही इथेच आजुबाजुला बसले आहेत, याची जाणीव सतत होते. पप्पा तुम्ही आज असायला हवे होता. तुमची खूप उणीव भासते. तुमच्यावर प्रेम करणारे आपलं पिंपरी-चिंचवड शहर तुम्हाला खूप मिस करतं. तुमच्या वाढदिवसाला जयंती कशी म्हणायची? अशी अवस्था माझ्यासह सर्वांचीच आहे.

पप्पा तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असूद्या… तुमच्या संस्कारांचा वारसा…आम्ही आयुष्यभर नेटाने सांभाळू…असा शब्द देते. लब यु पप्पा..वुई ऑल मीस यू…!!

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button