breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Indrayani Thadi-2023 : ‘इंद्रायणी थंडी’ महोत्सवात दिसणार अयोध्येतील राम मंदिराची भव्य प्रतिकृती

आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, बाबुराव पाचर्णे आणि दिगंबर भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा

भोसरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इंद्रायणी थडी-2023’ महोत्सव 25 पासून भोसरी येथील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव 25 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे या यात्रेत अयोध्येतील राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या प्रतिकृतीचे काम सध्या जोरदार सुरू आहे. वायकर सेट डिझाइनचे मालक संतोष वायकर आणि गाथा इव्हेंटचे मालक नंदकुमार यनभर यांच्या संयुक्त विद्यमाने हा सेट उभा करण्यात येत आहे.

तसेच एक विशेष आकर्षण म्हणजे चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, आमदार मुक्ता टिळक, बाबुराव पाचर्णे यांच्यासह माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘‘इंद्रायणी थडी’’ महोत्सवात पक्ष निष्ठेचे प्रेरणास्थळ साकारण्यात येणार आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात जगताप यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. लोकमान्य टिळक यांच्या घराण्यातील आमदार मुक्ता टिळक यांनी पुण्याचे महापौरपद भूषवले आहे. कसबा मतदार संघ व पुण्याच्या विकासात त्यांचे योगदान राहीले आहे. मावळ विधानसभा मतदार संघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दिगंबर भेगडे आणि शिरुर मतदार संघातील माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचेही निधन झाले. या नेत्यांनी ग्रामीण भागात भाजपा वाढवण्यासाठी योगदान दिले आहे.

अयोध्येतील राम मंदिराची भव्य प्रतिकृती
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button