छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा; पोलिसांच्यी गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ
![A clash broke out between two groups in Chhatrapati Sambhajinagar's Kiradpura area](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/chhatrapati-sambhajinagar-780x470.jpg)
छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. किराडपुरा भागात रात्री एक दीडच्या सुमारास काही समाजकंटकांनी पोलिसांची वाहन पेटवून हुल्लडबाजी केल्याची घटना घडली.
समाजकंटकांनी वाहने पेटवल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. किराडपुरा भागात राम मंदिर आहे. समाजकंटकाने रस्त्यावर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या वाहनांना पेटवून दिल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अफवा पसरली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी या परिसरात जाऊन सगळ्यांना आवाहन केले. आता या भागात सर्व सुरळीत आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज, फोटो किंवा व्हिडीओचं सत्य पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.