breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून मध्यमवर्गीयांची मोठी थट्टा; राष्ट्रवादीची टिका

केवळ विधाने नाही, महागाई थांबवण्याची कृती हवी

पुणे : देशाच्या अर्थमंत्री निर्लमा सीतारमन यांनी एका मुलाखतीत मी मध्यवर्गीयच आहे, मध्यमवर्गीयांच्या त्रासाची मला कल्पना आहे, असे मत मांडले आहे. या मतातून त्यांना मध्यवर्गीयांची थट्टा केली असं म्हणणे चुकीचे नाही. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून वाढत्या महागाईमुळे मध्यमवर्गीयांची पिळवणूक होत आहे. वाढते गॅस, इंधन, वीज दर याचा परिणाम हा मध्यमवर्गीयांच्या खिशावर होत आहे याची कल्पना अर्थमंत्र्यांना नाही.

केवळ मुलाखतीकरीता त्यांनी हे वक्तव्य केले असेल तर ती देशातील तमाम मध्यमवर्गीयांची थट्टाच म्हणावी लागेल. दोन वेळचे जेवण करण्यासाठी गॅस सिलेंडरला एक हजार रुपये मोजावे लागतात तेव्हा वाढती महागाई मध्यमवर्गींयाच्या पोटाला चिमटा काढते, हे अर्थमंत्र्यांच्या कल्पनेपलीकडे आहे. त्यामुळे केवळ कल्पना नको कृतीतून महागाईला ब्रेक लावा. तर जनता तुमच्या विधानांवर विश्वास ठेवेल, अशी टिका राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.

मी स्वत: मध्यमवर्गीय आहे. त्यामुळे मध्यमवर्गींना होणाऱ्या त्रासाची मला कल्पना आहे. गेल्या काही वर्षात आम्ही मध्यमवर्गीयांवर कोणतेही नवीन कर लादलेले नाहीत. टॅक्स स्लॅबमध्येही बदल करण्यात आले नाहीत. ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न पूर्णत: करमुक्त आहे. आम्ही देशातील २७ शहरांमध्ये मेट्रोचे निर्माण केले आहे. मध्यमवर्गीयांना त्याचा मोठा फायदा होतो आहे. तसेच ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर होते आहे. त्यामुळे आम्ही १०० स्मार्ट सिटींचे निर्माण करतो आहे. यासाठी निधीही देण्यात आला आहे. देशातील मध्यमवर्गीय जनतेसाठी जे काही करत येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं वक्तव्य निर्मला सीतारमन यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button