breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

Union Budget 2024 | इन्कम टॅक्सबाबत बजेटमध्ये मोठी घोषणा, नवी करप्रणाली कशी असेल?

Income Tax Slab 2024-2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना फायदा होणार आहे. आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत.

नवीन करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र जुन्या प्राप्तिकर प्रणालीत रिर्टन भरणाऱ्यांची निराशा अर्थमंत्र्यांनी केली. त्यांच्यासाठी करात सवलत देण्यात आलेली नाही. अर्थमंत्र्यांनी जुन्या करातील मूळ सूट मर्यादेत वाढ केलेली नाही. कर दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभही मिळणार नाही.

हेही वाचा     –      Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी

नवी करप्रणाली कशी असेल? (वार्षिक उत्पन्नानुसार)

०-३ लाख- कुठला कर नाही
३-७ लाख – ५ टक्के
७-१० लाख- १० टक्के
१०-१२ लाख- १५ टक्के
१२-१५ लाख- २० टक्के
१५ लाखांपेक्षा अधिक- ३० टक्के कर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button