breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात खिंडार, ४० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार

पिंपरी | लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची झालेली पडझड अजून काही थांबलेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आली आहे. अशात राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहेत. लोकसभेत शरद पवार गटाला मिळालेले यश हे अनेक जिल्ह्यातील समीकरणे बदलत आहे. शरद पवार गटात कार्यकर्त्यांचे इन्कमिंग वाढले आहे. विशेषतः अजित पवार गटातून शरद पवार गटात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्येच दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. पिंपरी चिंचवडचे ४० पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. लवकरच त्यांच्या प्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला रायगडची एकमवे जागा जिंकता आली. बारामतीसह इतर तीन जागांवर अजित दादांच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता पक्षातील पदाधिकारीही अजित दादांची साथ सोडून जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ४० हून अधिक कार्यकर्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे सर्व पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा     –      दूधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याआधीच म्हटले आहे की, अजित दादा गटातील अनेक आमदार निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात येण्याच्या तयारीत आहेत. इतर पक्षात गेलेल्यांना परत पक्षात घेणार का, यावर शरद पवार मंगळवारी म्हणाले की, पक्ष सोडून गेलेले मला कोणीही भेटले नाही. पण आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लोक भेटले आहेत, याची मला माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button