मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी परतले महाराष्ट्रात!
![25 students stranded in Manipur returned to Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी मणिपूरमध्ये सुरू असलेल्या दंगलीच्या परिस्थितीत अडकले असल्याचे समजताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि ते विद्यार्थी परतल्याची माहीती समोर येत आहे.
मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला होता.
हेही वाचा – ‘केंद्रातील सत्ता गेल्यानंतर नरेंद्र मोदी तुरूंगात जाऊ शकतात’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चर्चा केली होती, त्यानंतर काल सकाळी या विद्यार्थ्यांना इंफाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर काल (८ मे) रात्री विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले.