breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अदानी समूहाचा गुंतवणूकदारांना मोठा धक्का; २० हजार कोटींचा FPO रद्द

गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ नये यासाठी समूहाचा मोठा निर्णय

मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चने अडणी समूहाविषयी सहवाल सादर केल्या पासून असे वाईट दिवस समूहाला सुरू झाले आहेत. त्यानंतर आता अदानी समूहातील गुंतवणूकदारांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर अदानी एंटरप्रायजेसने 20 हजार कोटी रुपयांचा FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर गौतम अदानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची बॅलन्सशीट मजबूत स्थितीत असून गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ नये यासाठी हा FPO मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं अदानी यांनी सांगितलं.

गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ नये यासाठी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाने बाजारात दाखल केलेला एफपीओ अखेर रद्द केला. बाजारातील चढउतार बघता, अदानी एंटरप्राईजच्या संचालक मंडळाने एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विषयीची माहिती चेअरमन गौतम अदानी यांनी दिली.

गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे अदानी यांनी म्हटलं आहे. गुंतवणूकदारांनी अदानी एंटरप्राईजेसच्या एफपीओमध्ये मोठ्या प्रामाणात गुंतवणूक केली होती. ही रक्कम त्यांनी परत करण्यात येणार आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यात येणार असल्याचं समूहाने स्पष्ट केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button