Nagaland Election Result : रामदास आठवले गटाचे २ आमदार नागालँडमध्ये विजयी
![2 MLAs of Ramdas Athawale group won in Nagaland](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/ramdas-athawale-780x470.jpg)
नागालँडमध्ये पहिला महिला आमदार मिळाला
Nagaland : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे. एक्झिट पोलनुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर नागालँडमध्ये महाराष्ट्रातील पक्षांनाही यश मिळालं आहे.
नागालँडमध्ये रिपाईंच्या रामदास आठवले गटाचे २ आमदार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५ जागांवर आघाडीवर आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडमध्ये इतिहास रचला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अधिकृत उमेदवार इम्तिचोबा आणि वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँडमध्ये रिपाईंने ऊस शेतकरी या निशाणीवर आठ जागांवर निवडणूक लढली आणि त्यात दोन उमेदवार विजयी झाले. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
दरम्यान, नागालँडमध्ये पहिला महिला आमदार मिळाला आहे. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या हेकानी जाखलू यांनी १५३६ मतांच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला आहे. यासह त्या नागालँडमधील पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. नागालँडमध्ये एकूण चार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या.