breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
गेटवे ऑफ इंडिया येथून होणार गांधी शक्ती यात्रेचा प्रारंभ; शरद पवार- यशवंत सिन्हा यांची भेट
मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून उद्या, गुरूवार, दिनांक ९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १० वाजता ‘गांधी शक्ती यात्रेचा’ प्रारंभ होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ करतील. देशाचे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने ही गांधी शक्ती यात्रा काढण्यात येत आहे. बुधवारी या संदर्भात यशवंत सिन्हा यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली