विधानपरिषदेतील नवनिर्वाचित 11 उमेदवार आज घेणार शपथ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-21-3-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महायुतीने महाविकासआघाडीला धोबीपछाड दिली. विधानसभेत 11 जागांसाठी उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. तर इतर 11 उमेदवार हे विजयी झाले. आता विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सर्व विजयी उमेदवारांना शपथ देणार आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार आहे. आज 11 वाजता विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या विजयी उमेदवारांना शपथ देतील.
कोणकोणते आमदार घेणार शपथ?
पंकजा मुंडे – भाजप
योगेश टिळेकर – भाजप
अमित गोरखे – भाजप
परिणय फुके – भाजप
सदाभाऊ खोत – भाजप
भावना गवळी – शिंदे शिवसेना
कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रज्ञा सातव – काँग्रेस
मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष
हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून 31 जुलैपर्यंत 62 रेल्वे गाड्या रद्द
दरम्यान विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी 12 जुलै रोजी मतदान पार पडले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उभे होते. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात होता.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उभे असलेल्या 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून आले होते.