breaking-newsTOP Newsदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात १० जवान शहीद

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये आज नक्षलवादी हल्ला झाला आहे. यामध्ये 10 जवान शहीद झाले आहेत तर एका चालकाचा मृत्यू झाला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरनजीक हा मोठा हल्ला झाला आहे. आज दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या या IED ब्लास्टमध्ये DRG (जिल्हा राखीव रक्षक) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला उडवण्यात आले.

गुप्ततर विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नक्षलवादविरोधी मोहीमेवरून हे सर्व पोलीस परतत असताना ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी IED स्फोट घडवून आणला आहे. दरम्यान या हल्ल्याचा निषेध करत नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी म्हटलं आहे.

डीआरजी अर्थात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे हे सर्व पोलीस होते. नक्षलवाद्यांशी सामना करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या स्थानिकांचा या पथकामध्ये समावेश होता. बस्तरमधील नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये डीआरजीची मोठी मदत प्रशासनाला झाली आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button