breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Ajit-Pawar-copy-1.jpg)
मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर्भातील सिंचन गैरव्यवहार प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही असं नमूद केलं आहे.
विदर्भातील सिंचन गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच एसीबीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गैरव्यवहाराबाबत जबाबदार धरता येणार नाही, तसंच त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही, असं शपथपत्र हायकोर्टात दाखल केलं.