breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात… शिवसेनेची नेमकी भूमिका काय?

रत्नागिरी | महाईन्यूज|

सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे.

नाणार प्रकल्प रद्द झाला असं शिवसेना सांगत असली तरी नाणार प्रकल्पावरून कोकणातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. त्याला कारणीभूत ठरलं आहे ते सामना वृत्तपत्रात आलेली नाणार समर्थनाची जाहीरात. सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल’ कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी सामनामध्ये जाहीरात देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, नाणार व्हावा यासाठी आता भाजपसह शिवसेनेतील देखील काही कार्यकर्ते आणि नेते नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नाणार पुन्हा येणार की कायमचा हद्दपार होणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button