शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी काँग्रेस देणार राज्यपालांना निवेदन
मुंबई: केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना काँग्रेस निवेदन देणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राज्यपालांना आजच भेटणार होते. परंतू, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. हे पाटील हे कोरोनाबाधित झाल्याने खबरदारी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज राज्यपालांना भेटणार नाहीयेत अशी माहिती आहे. त्यांच्याऐवजी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन देणार आहेत.
I have been tested positive for #Covid19. I am asymptomatic but quarantined myself for 10 days. I would be perfectly alright soon with your wishes.I request to all those who had come in contact with me in the last couple of days to get themselves tested as a precaution.Stay safe!
— HK Patil (@HKPatilINC) September 28, 2020