breaking-newsमुंबईराजकारण

“शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर भाजपा सत्ता स्थापनेसाठी तयार”

मुंबई | महाईन्यूज

भाजपासोबतची युती तोडून शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची मोट बांधली. त्यानंतर सत्ता स्थापन करत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र, शिवसेना पुन्हा परत येईल, ही भाजपाची आशा अजून मावळलेली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तसं बोलून दाखवलं आहे. “शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून अडचण नाही,” असं मुनगंटीवार म्हणालेले आहेत.

नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हे विधान केलं. मुनगंटीवार म्हणाले,”शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. आताही शिवसेनेनं प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपाकडून अडचण नाही. ‘देर आये दुरूस्त आये, सुबह का भूला श्याम को आया’ असं आम्ही समजू,” असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर “मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्तावही मनसेकडून आलेला नाही. पण, समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपाची भूमिका आहे,” असं सांगत त्यांनी मनसेबाबत भाजपाचं मत अनुकूल असल्याचंही अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button