breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

रोहित पवारांचा ‘Happy Valentines Day’ मध्येही टोला

मुंबई | संपूर्ण जगभरात आज ‘Valentine Day’ साजरा करण्यात येत आहे. अनेकजण आज आपल्या प्रेमाची कबुली देतात. या दिवसाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही एका खास पद्धतीने साजरा केला आहे.

रोहित पवारांनी व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत एक हटके ट्वीट केले आहे ज्याची चांगलीच राजकीय चर्चा सुरू आहे. ‘हा दिवस स्वच्छ व खऱ्या अर्थाने निस्वार्थी प्रेम करणाऱ्यांचा आहे’ असं म्हणत त्यांनी ट्वीटची सुरुवात केली पण त्यानंतर असं केंद्र सरकारला चांगलाच टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

आजच्या प्रेमाच्या दिवशी सगळेजण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी आवडत्या गोष्टी करतं. पण तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करणार असाल तर लक्षात असूद्या. गॅसचा दर 910 रुपये प्रती सिलिंडर झाला आहे असं ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा |  

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button