breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याला तिव्र विरोध, विनायक मेटेंनी दिला सज्जड इशारा

पुणे: मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली 13 मराठा संघटनांची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीत सरकार विरोधात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (9 ऑगस्ट) क्रांती दिनी नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांचा मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येणार आहे. काळे कपडे घालुन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी दिलेला आहे.

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या त्यांचा नाशिकचा दौरा रद्द केला तर पुण्यातील बालगंधर्व चौकात मराठा समनव्य समितीकडून जागरण गोंधळ घालत सरकारला जाब विचारला जाईल. त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असलेल्या उपसमितीवरुन मंत्री अशोक चव्हाण यांना हटवा, अशी मागणी केलेली आहे. आज पुण्यात मराठा समनव्य समितीची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनायक मेटे यांनी दिलेली आहे.

…अन्यथा 17 ऑगस्टला आंदोलन छेडणार

मराठी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार निष्काळजीपणा दाखवत आहे. राज्य सरकारनं मराठा समाजाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केलेले आहे. याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे. त्याच्याच नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षणाचा मुद्दा गेला आहे, अशी टीका विनायक मेटे यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा आवाज ऐकला नाही तर येत्या 17 ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल. राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button